ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस - माजिद मेमन यांची टीका

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस - माजिद मेमन यांची टीका

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींचा उल्लेख अडाणी आणि सडकछाप माणूस असा केला आहे.

माजिद मेमम मोदींवर टीका करताना म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचे पद घटनात्मक पद आहे. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच जनता थेट पंतप्रधानाची निवड करत नाही. तर जनतेकडून निवडलेले खासदार पंतप्रधानाची निवड करतात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.''

''राजकारण्यांकडून भाषा आणि वर्तनाच्याबाबतीत चांगल्या आचरणाची अपेक्षा केली जाते. एक आदर्श व्यक्ती म्हणून जनता अशा राजकारण्यांकडे पाहत असतेत्यांच्या कृतीचे आचरण करत असते. मात्र हल्लीच्या काळात नरेंद्र मोदी विरोधकांवर टीका करताना भाषेची मर्यादा विसरत चालले आहेत. त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे, अशी टीका माजिद मेमन यांनी केली.  

मागे

नरेंद्र मोदींची राज्यातील पहिल्याच सभेत शरद पवारांवर टीका
नरेंद्र मोदींची राज्यातील पहिल्याच सभेत शरद पवारांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्य....

अधिक वाचा

पुढे  

मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा कडूनच पोलखोल ?
मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा कडूनच पोलखोल ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि नेते प्रचारासाठी सज्ज झ....

Read more