By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बुधवारी विधानभवनात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी विधानभवनात खऱ्या अर्थाने सोहळ्याचे स्वरूप आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सगळ्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. विधानभवनात आनंदी असलेल्या सुप्रिया सुळेंची लगबग पाहायला मिळाली. महाराष्ट्रविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे ट्विटमध्ये असं म्हणतात की,'आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन...महाराष्ट्रविकासआघाडीची सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप आला. या भूकंपाने फक्त महाराष्ट्राची जनताच नव्हे तर पवार कुटुंबीय देखील हादरलं. अजित पवारांनी भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुप्रिया सुळेंसाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन -@OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
23 नोव्हेंंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत तणावात वावरत असलेल्या सुप्रिया सुळे आता आनंदी आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी विधानभवनात शपथविधी करता पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळेंनी दादा अजित पवारांची गळाभेट घेत आपला आनंद व्यक्त केला होता.
आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कव....
अधिक वाचा