ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

’24 नको, 22 जानेवारीलाच येतो’, रोहित पवार यांची ईडीच्या समन्सवर पहिली प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2024 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

’24 नको, 22 जानेवारीलाच येतो’, रोहित पवार यांची ईडीच्या समन्सवर पहिली प्रतिक्रिया

शहर : मुंबई

रोहित पवार यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीच्या या कारवाईवर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रोहित पवार यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा करण्यात आलेल्या लिलाव प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला होता. याच प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी ईडीकडून रोहित पवार यांना 24 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या या समन्सवर रोहित पवार यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली. आपण ईडी अधिकाऱ्यांना 24 जानेवारी पेक्षा 22 किंवा 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलवा, असं सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

“ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन आणि मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते, तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांनाही समन्स

रोहित पवार यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनादेखील ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स बजावलं आहे. कथित कोविड बॉडी घोटाळा प्रकरणी पेडणेकर यांना 25 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीच्या या कारवाईवर किशोरी पेडणेकर यांचीदेखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुळात मला आश्चर्य वाटतं, ईडी आपल्या ऑफिसमध्ये बसते की कोणाच्या घरी? कोव्हिड घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही. माझ्यापर्यंत अजून नोटीस पोहचली नाही. आली तर मी चौकशीला नक्की जाईन. मात्र मला अजून नोटीस आली नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जे आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

मागे

आधी रोहित पवार यांना समन्स, आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
आधी रोहित पवार यांना समन्स, आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी प....

अधिक वाचा

पुढे  

रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?
रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार या....

Read more