ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार : सुप्रिया सुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2021 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार : सुप्रिया सुळे

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील. (NCP Supriya Sule Will Meet Gazipur Farmer)

मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु: होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव:… परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिसा सुळे यांनी म्हटलं आहे. ‘एएनआयशी त्या बोलत होत्या.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही एक आंदोलन झालं. अतिषय चांगल्या प्रकारे हे आंदोलन पार पडलं. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतंय अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं सुळे म्हणाल्या.

संजय राऊतांनी घेतली राकेश टीकैत यांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा करुन शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा मेसेज त्यांना दिला. तसंच मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंच्या सूचनेवरुन आम्ही भेटायला आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टीकैत यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार प्रहार केले. देशात लोकशाही शिल्लक आहे काय, असं विचारत केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी ज्या प्रकारे वागत आहे ते निषेधार्ह असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

टिकैत यांना अश्रू अनावर

शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.

मागे

‘माझी भूमिका तीच फडणवीसांचीही’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती
‘माझी भूमिका तीच फडणवीसांचीही’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

भाजपचे राज्यातील मोठे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख....

अधिक वाचा

पुढे  

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाच्या विळख्यात
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाच्या विळख्यात

राज्यात ऐकीकडे कोरोना रूग्णांची संख्या मंदावत आहे, तर दुसरीकडे राज्याचे गृ....

Read more