By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 09:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रायबरेली आणि अमेठी मध्ये कॉग्रेसचा निवडणूक प्रचार सांभाळणार असून बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादीचा पाठींबा असणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्याठिकाणी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाही तिथे जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार आहोत. शिवाय बनारसमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा एक उमेदवार देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.शिवाय निवडणूक आचारसंहितेचा सक्तीने पालन व्हायला हवे. एखादयाची बायोपिक येणार असेल तर त्यातील गोष्टींकडे निवडणूक आयोगाने लक्ष देवून कारवाई करायला हवी असेही त्रिपाठी म्हणाले.पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
मुंबई - ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई ह....
अधिक वाचा