ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण 

शहर : मुंबई

      मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळासह अनेकांना या झेंड्याविषयी उत्सुकता होती. अखेर आज या झेंड्याचे अनावरण झाले. भगव्या रंगाच्या या झेंड्यावर शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


       या नव्या झेंड्याबरोबरच मनसे आगामी काळात आपल्या राजकारणाची दिशाही बदलणार आहे. आता मनसे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारण करील. आज झेंड्याचे अनावरण झाले असले तरी यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजकारणासाठी वापरल्यास आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. तसेच निवडणूक आयोगाकडूनही या झेंड्याला परवानगी मिळेल का, याबद्दल अद्याप साशंकता आहे. 


        आजच्या अधिवेशनात मनसेकडून आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येईल. शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 

मागे

मंत्रीमंडळच्या बैठकीत ६ महत्वाचे निर्णय जाहीर
मंत्रीमंडळच्या बैठकीत ६ महत्वाचे निर्णय जाहीर

   मुंबई : महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य....

अधिक वाचा

पुढे  

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड
मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड

       मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आज पार पडत असून या....

Read more