By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 08:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. कारण काँग्रेसच्या पाठिंब्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेकडे काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्रक आलेलंच नाही. काँग्रेसकडून जे पत्रक आलंय त्यामध्ये पाठिंब्याचा उल्लेखच नाही. त्यामुळे शिवसेनेच मोठी अडचण झाली आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेच्या प्रतिसादासाठी दिलेली मुदत संपत आली तरीही काँग्रेसने अद्यापपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचं जे पत्रक आलं आहे ज्यात म्हटलंय की, 'काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची सकाळी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षांची शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली. याबाबत पुढेही राष्ट्रवादीशी चर्चा होईल.'
महाराष्ट्रात राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर आता शिवसेना सत्तेचा दावा करणार आहे. दिल्लीतूनही शिवसेनेसाठी खूशखबर आली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ऐतिहासिक आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशीही चर्चा झाली. काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिल्याची चर्चा होती.दरम्यान, राज्यपालांच्या निमंत्रणानंतर आता अखेर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी राजभवन इथं राज्यपालांची भेट घेतली आहे.
राज्यातील सत्तासिंहासनाच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्यानंतर शिवसेनेला मोठा ध....
अधिक वाचा