By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2020 08:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चीन आपली जमीन बळकावतंय. पण आपले राज्यकर्ते कायर आहेत. काँग्रेसची सत्ता असती तर चीनला 15 मिनिटांत बाहेर काढलं असतं, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत ‘चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा’, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.
चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा , असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
“राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण अँटनी यांनी हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?”, असं ट्विट करत त्यांनी राहुल गांधीवर देखील टीकास्त्र सोडलंय.
राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, "आमच्या चर्चा सुरू आहे". चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?? https://t.co/e3MXz2pZZp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
निलेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणारं ट्विट
“राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा”
काय म्हणाले होते राहुल गांधी
पंतप्रधान मोदी हे भित्रे आहेत. त्यांनी चीनला आपली जमीन बळकावण्याची संधी दिलीये. मात्र याच जागी काँग्रेसचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटांतच बाहेर फेकून दिले असते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेच्या विरोधात लढणार आहे. ....
अधिक वाचा