By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कृषी विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या दुटप्पी भूमिकेवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. “आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि यानंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय”, असा सवाल त्यांनी विचारला आहे. पहिल्यांदा CAA बिलाला आणि त्यानंतर कृषी बिलाला, दोन्ही वेळेला शिवसेनेने लोकसभेत समर्थन दिलं. मात्र राज्यसभेत या दोन्ही बिलाला विरोध केला याचं नेमकं कारण काय? संजय राऊत यांना शिवसेनेचे लोकसभेचे खासदार किंमत देत नाही तसंच नेता मानत नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर तसंच राऊतांवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत, “आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय?, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाही व नेता मानत नाही. संजय राऊत 99 टक्के शिवसैनिकांना खटकतात म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संजय राऊतांना बाजूला करतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, असं निलेश राणे म्हणाले आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी देखील शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली होती. शिवसेना हा एक कन्फ्यूज पक्ष आहे. त्यांना दुटप्पी भूमिका घ्यायची सवय झालेली आहे, अशी टीका फडणीसांनी सोमवारी नागपुरात बोलताना केली होती. तर भाजपशी लढणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?, असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 22, 2020
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
“शिवसेना हा एक कन्फ्यूज झालेला पक्ष आहे. त्यांच्या भूमिकांबद्दल आता आश्यर्च वाटत नाही. त्यांना दुटप्पी भूमिका घ्यायची सवय आहे. आमच्यासोबत असताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका बजावल्या. एकतर शिवसेनेने कधीच शेतीसंदर्भात भूमिका मांडली नाही. आतातरी शिवसेनेने राजकारण न करता शेतकऱ्यांबद्दल भूमिका घ्यावी”
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?- प्रकाश आंबेडकर“शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आता संपले असून आता त्यांना हमीभाव मिळणार नाही, अशावेळी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला, याचा त्यांनी जाहीर खुलासा करावा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं होतं.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यू....
अधिक वाचा