By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 08:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनावर भाजप नेते टीका करताना दिसत आहेत. महाविकासआघाडीने 'आम्ही 162'द्वारे शक्तीप्रदर्शन करून आपलं संख्याबळ झालं असून सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडी सज्ज आहे. असं असताना माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितलं तरी ते दोघ करणार. पण एका गोष्टीच वाईट वाटलं शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखं दोन हॉटेल बदलून आणल गेलं आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 25, 2019
निलेश राणेंनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. 'काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितलं तरी ते दोघ करणार. पण एका गोष्टीच वाईट वाटलं शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखं दोन हॉटेल बदलून आणल गेलं आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.'अशी टीका केली आहे.
शिवसेना-भाजपमध्ये सत्तावाटपाच्या वादातून दुरावा आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे भाजपचा समाचार घेतात. यांच्यावर निलेश राणेंनी या आधीदेखील टीका केली आहे. 'संजय राऊत हे गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे आहेत,' अशी नीलेश राणेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.
महाविकासआघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्....
अधिक वाचा