By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
“शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलायचा शिवसेनेला (Shivsena) अधिकार काय?” असा सवाल माजी खासदार निलेश राणे
“बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही. कारण महाविकास आघाडीबाबत असंतोष आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये हे चित्र दिसेल” असं निलेश राणे म्हणाले.
“बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. स्वतःचा कचरा कसा करायचा, यावर शिवसेनेने पीएचडी केली आहे. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेचा देशभरात कचरा झाला. इकडे तिकडे स्वतःचा कचरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कामं करावीत” असा बोचरा हल्लाही निलेश राणेंनी केला.
“ज्या राज्यात शिवसेना उभी राहते, त्या राज्यात शिवसेनेचा पराभव होतो. आता तरी शिवसेनेने यातून धडा घ्यावा आणि महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत करावं” असा सल्लाही निलेश राणेंनी दिला.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
संजय राऊतांवर हल्लाबोल
“बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय? बिहारमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं, ते मुख्यमंत्रिपदावरुन बोलणार. संजय राऊत यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार? त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांची किंमत काय आहे समाजामध्ये? संजय राऊत एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत. संजय राऊत आणि निवडणूक यांचा काही संबंध नाही” असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला.
“बिहार निवडणुकीमध्ये लालूप्रसाद यादव यांचा पक्ष जिंकणार, अशी हवा तयार करण्यात आली होती. पण ती हवा पुन्हा एकदा फुसकी निघाली. बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचं जंगलराज नाही हे त्यातून स्पष्ट होते” असंही निलेश राणे म्हणाले.
“राहुल गांधींना राजकारण जमत नाही हे बिहारच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झालं. राजकारणाची परिपक्वता लागते, उंची लागते, ती या निवडणुकीत राहुल गांधी यांच्यामध्ये दिसली नाही.” अशी टीकाही निलेश राणेंनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे दिलं, त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळालं. लोकांच्या मनामध्ये भाजप आहे, कमळ आहे, म्हणून निवडणुका कुठल्याही राज्यात असू दे, त्याचा निकाल बीजेपीच्या बाजूने लागतो” असेही ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Results) एनडीएला (NDA ) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्....
अधिक वाचा