ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पूर्णवेळ स्वतंत्र कार्यभार असलेल्या सीतारमण पहिल्या महिला अर्थमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 05:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पूर्णवेळ स्वतंत्र कार्यभार असलेल्या सीतारमण पहिल्या महिला अर्थमंत्री

शहर : देश

माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांना अर्थमंत्री बनवण्यात आलं आहे. देशाच्या पहिल्या संरक्षण मंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. निर्मला सीतारमण या भारताच्या पहिल्या महिला स्वतंत्र कार्यभार असलेल्या अर्थमंत्री बनल्या आहेत. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांनी देखील अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला होता. पण त्या त्यावेळी पंतप्रधान देखील होत्या. याआधी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते संरक्षणमंत्री होते. तेव्हा देखील त्यांनी इतिहास रचला होता. संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला होता.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संरक्षणमंत्री पद हे राजनाथ सिंह यांना सोपवण्यात आलं आहे. तर निर्मला सीतारमण यांना अरुण जेटली यांच्याकडे असलेलं अर्थमंत्री हे पद देण्यात आलं आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे जेटली यांनी जबाबदारी देऊ नये असं पत्र लिहिलं होतं.

निर्मला सीतारमण यांच्यापुढे मोठी आव्हान असणार आहेत. भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला मजबूत करण्यासाठी त्यांना काम करावं लागणार आहे. सीतारमण पुढच्या महिन्यात बजेट देखील सादर करणार आहेत. महागाई, तेलांच्या वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे.

निर्मला सीतारमण यांचा राजकीय प्रवास

निर्मला सीतारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला तमिळनाडूच्या मदुरैमध्ये नारायण सीतारमण यांच्या घरी झाला होता. सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून त्यांनी बीए केलं. त्यानंतर 1980 मध्ये जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीणध्ये एमए केलं. यानंतर त्यांनी गॅट फ्रेमवर्कअंतर्गत इंडो-यूरोपियन टेक्सटाइल ट्रेड विषयात पीएचडी केली. त्या नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या सदस्या देखील होत्या. 2006 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2014 मध्ये मंत्रीपद मिळालं. याआधी त्या भाजपच्या 6 प्रवक्त्यांपैकी एक होत्या. ज्यामध्ये रविशंकर प्रसाद देखील होते.

निर्मला सीतारमण यांचे पती डॉक्टर पराकाला प्रभाकर आधी भाजपचे आंध्र प्रदेशातील प्रवक्ते होते. 2000 नंतर निर्मला सीतारमण या हळूहळू राजकारणाकडे वळाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये सक्रीय राजकारणासह लोकप्रियता मिळवली.  बाद नितिन गडकरी भाजप अध्यक्ष असताना 2010 मध्ये त्यांना भाजपने प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं. 26 मे 2016 ला निर्मला सीतारमण यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार देण्यात आला. याशिवाय त्या अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या राज्यमंत्री देखील होत्या. जो तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अंतर्गत होतं.

 

मागे

महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?...
महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ खासदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ ....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर मोदी पहिलाच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर मोदी पहिलाच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच....

Read more