ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर एफ-१६ विमानातील क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले; अमेरिकेला सितारामन यांचा सवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर एफ-१६ विमानातील क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले; अमेरिकेला  सितारामन यांचा  सवाल

शहर : देश

पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाचा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकन मासिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. हे वृत्त देण्यापूर्वी संबंधित मासिकाने माहितीची आणि तथ्यांची खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती. कारण भारतीय हद्दीत AMRAAM या क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. हे क्षेपणास्त्र केवळ एफ-१६ विमानामध्येच असते. याशिवाय, भारताकडे एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पुरावे असल्याचेही सितारामन यांनी सांगितले.

अमेरिकास्थित एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ-१६ विमानांची मोजणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा पाकिस्तानच्या ताफ्यातील एफ-१६ विमानांची संख्या जैसे थे असल्याचे या मासिकाने म्हटले होते. मात्र, भारतीय वायूदलाने या दाव्याचे खंडन केले. विमानातील कॅमेरा आणि रडारच्या पुराव्यानुसार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा वेध घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत वायूदलाने अनेक पुरावे समोर ठेवले होते.

भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारीला पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. यामध्ये एफ-१६, जेएफ-१७ आणि मिराज , मिराज या विमानांचा समावेश होता. ही विमाने भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय वायूदलाला कळवण्यात आले. त्यानुसार भारताच्या सुखोई ३० एमकेआय, मिराज-२००० आणि मिग-२१ या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला. भारताच्या या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेच पळही काढला. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग केला. पाकव्याप्त नौशेरा सेक्टरमध्ये असताना मिग-२१ विमानातून डागण्यात आलेल्या आर७३ आर्चर या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता. त्यावेळी उत्तर दिशेला पाकचे एक जेएफ१७ विमानही होते. यावेळी AWACS प्रणालीने काही मिनिटांच्या फरकाने टिपलेल्या छायाचित्रांमध्येही एफ-१६ विमान नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा भारतीय वायूदलाने केला होता.

मागे

राष्ट्रवादी काँग्रेसला  धक्का; जयदत्त क्षीरसागर “मातोश्रीवर”
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; जयदत्त क्षीरसागर “मातोश्रीवर”

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी....

अधिक वाचा

पुढे  

रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा चढल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना ....

Read more