By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठीचा द्वेष करणाऱ्या आणि महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीतमनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नसल्याची भूमीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलय. मागील काही दिवसांपासून संजय निरूपमचा प्रचार मनसे करणार का? या प्रश्नाला मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे. संजय निरूपम आणि मनसे यांच्यात उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. इतकचं नव्हे तर संजय निरुपम मुंबई अध्यक्ष असताना राज ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यातूनच संजय निरुपम यांचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात मनसे माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. भाजपाला मतदान करु नका असं आवाहन करत राज्यभरात लोकांना रिमाइंडर म्हणून 10 सभा घेणार असल्याचं राज यांनी सांगितले होते. आपल्या या प्रचारसभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर झाला मात्र देशाला वाचविण्यासाठी भाजपाविरोधात प्रचार करणार अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं काँग्रेसला धक्कातंत्र सुरुच आह....
अधिक वाचा