By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2021 08:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून बरेच वादविवाद सुरू आहेत. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचं सांगून नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू. बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी!, संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्त्वाचा की मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, असं ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
नाव बदल आमचा कार्यक्रम नाही : बाळासाहेब थोरात
राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले होते. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मी इकडे आलोय. शेतकऱ्यांना आम्ही मोठी मदत केली, चक्रीवादळात आणि अतिवृष्टीत आम्ही मोठी मदत केली. आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. पण, भाजपला रोखण्यासाठी काही तडजोड करावी लागली तर विचार केला जाईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
औरंगाबादच्या नामकरणाचा वाद
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) न....
अधिक वाचा