By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 04:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सिंधदुर्ग
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खाडना उपभियंता प्रकाश शेडेकर यांना जबाबदार धरून गडनदी पुलावर त्यांच्या अंगावर बादली भर चिखल ओतून आमदार नितेश राणे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यंनी बांधून ठेवण्याचा विडियो सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सलग चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्त्यावर चिखल झाला आहे. असे असताना हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाणे कोणतीच हालचाल न केल्याने आमदार नितेश राणे यांचा संताप अनावर झाला. नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व स्वाभीमाणीच्या कार्यकर्त्यंनी उपअभियंता प्रकाश शेडकर यांना गडनदी पुलावर घेरले. येथील नागरिक चिखलचा मारा सहन करीत आहेत. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या , असे राणे यानी शेडेकराना दरडवताच स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यंनी बादलीभर चिखल शेडेकरांच्या अंगावर ओतला. चिखल आणि खाडयामुळे कणकवलीची वाट लागली आहे. तिला तुम्हीच जबाबदार आहात, अस सांगून राणे यांनी शेडेकर यांना गड नदी पूल ते जाणवली पुलपर्यंत चालत नेले आणि त्यांना चिखल व खड्यांच साम्राज्य दाखवलं त्यानंतर कार्यकर्त्यंनी गड नदी पूलावरच शेडेकर यांना बांधून ठेवले. या सर्व प्रकारामुळे अभियंता वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्ली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव राहुल गांध....
अधिक वाचा