ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरीना आली चक्कर

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 02:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरीना आली चक्कर

शहर : सोलापूर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आली आणि ते खाली बसले. त्यांनी उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमले नाही. त्यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. प्राथमिक वैद्यकीय तपास त्यांना कुलगुरूंच्या घरी विश्रांतीसाठी नेण्यात आले. नितीन गडकरी यांना मधुमेह आणि रक्त दाबाचा त्रास आहे.

यापूर्वी नगरमधील राहुरी येथील कृषि विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिसेंबर 2018 मध्ये राहुरीत त्यांना चक्कर आली होती. त्यानंतर शिर्डीत 27 एप्रिल 2019 रोजी सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान गडकरीना अशीच चक्कर आली होती.

मागे

शिवसेनेतही मेगाभरतीचे संकेत
शिवसेनेतही मेगाभरतीचे संकेत

भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरू असतानाच शिवसेनेतही लवक....

अधिक वाचा

पुढे  

युवक कॉंग्रेसचे 'वेक अप महाराष्ट्र' अभियान 
युवक कॉंग्रेसचे 'वेक अप महाराष्ट्र' अभियान 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची 'महाजनादेश यात....

Read more