By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 04:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सीबीआयच्या निदेशकांकडे महाराष्ट्रातील जवळपास २२ आमदार आणि खासदारांची नावे सोपवली आहेत. आपल्याच मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणा-या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणा-या आमदार आणि खासदारांविरूद्ध तक्रार असल्याने त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांनी सीबीआय निदेशकांना आपल्या कार्यालयात बोलावून सगळ्या प्रकारची माहिती दिली. तसेच औरंगाबाद येथील रस्त्याच्या संदर्भात एका ठेकेदाराशी झालेल्या बोलण्यातून हा विषय गडकरी यांच्यासमोर आला.
या यादीत विदर्भ, मराठवाडा, पुणे तसेच कोकण विभागातील आमदारांची नावे असल्यांचे सूत्रांकडून समजले आहे. मराठवाड्यातील कार्यक्रमात बोलताना गडकरी बोट दाखवताना ‘हे टक्का मागणारे आमदार विदर्भातले वैगेरे नाहीत, मी मराठवड्यातल्या आमदारांविषयी गोष्ट करतोय’ असे म्हणाले होते
रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आण....
अधिक वाचा