ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे - नितीन गडकरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे - नितीन गडकरी

शहर : पुणे

आमच्या विचाराचं उद्दिष्ट साफ आहे, ते उद्दिष्ट सरकार आणणं किंवा कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणं नाही, आपलं काम हे संपूर्ण राष्ट्राचं पुनर्निर्माण करणे, संपूर्ण समाजात बदल घडवून आणणे आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  म्हटलं. ते पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.सानंद-सकुशल आणिमाणूस नावाचे काम या पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याला अभाविप, भारतीय विचार साधनेचे जेष्ठ कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

अभाविपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी  यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. “सध्या महाराष्ट्रात वेगाने घटना घडत आहेत. काही लोकांना मुख्यमंत्रिपद हवं आहे. पण आमचं उद्दिष्ट सरकार स्थापन करणं नाही, कुणाला मुख्यमंत्री करणं नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. नितीन गडकरींच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विचारधारा, सिद्धांत महत्वाचे तर आहेच. पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे मानवी संबंध आहेत. संसदेत माझ्या विचाराच्या हाडवैरी लोक सुद्धा माझी कामं करतात. त्याचं कारण म्हणजे आमच्यातील संबंध चांगले आहेत, असेही गडकरी म्हणाले. “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या गोंधळात विचारधारा, सिद्धांत यापेक्षा मानवी संबंध महत्त्वाचे आहेत, असं म्हणत नितीन गडकरींनी एक प्रकारे शिवसेनेला टोला लगावला आहे.

मागे

महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार
महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी साडे वाजता राज....

अधिक वाचा

पुढे  

भाजपचा क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा -  नवाब मलिक
भाजपचा क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा - नवाब मलिक

सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा रंगला आहे. भाजप....

Read more