By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिर्डीतल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली आहे. ते बोलत असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. तर, सभा सुरू असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली. तिथे तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याआधी डिसेंबर महिन्यात राहुरीमध्येही नितीन गडकरींना चक्कर आली होती. त्यावेळीही त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली होती. आता लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला आहे. मात्र शिर्डीतल्या सभेत नितीन गडकरींना चक्कर आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असेही समजते आहे.
सध्या राजकारण तापलं आहे आणि तसंच उन्हाचा पाराही चांगलाच वाढला आहे. याच उष्णतेचा त्रास नितीन गडकरी यांना झाला आणि ते अचानक खाली बसले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती समजते आहे.
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात 23 तारखेला पार पडलेल्या निवडणुकीत भडगाव शहराती....
अधिक वाचा