ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नितीन राऊत यांचा परिचय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नितीन राऊत यांचा परिचय

शहर : मुंबई

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून ऐनवेळी आलेलं नाव म्हणजे नितीन राऊत होय. नितीन राऊत हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील धडाडीचे नेते आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. राऊत 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितीन राऊत यांनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी त्याचा संबंध यासारख्या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत.नितीन राऊत यांनीसंकल्प या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले असून मागास वर्गातील जनतेला मदत करण्यासाठी ते काम करतात.

नितीन राऊत

पक्षकाँग्रेस

वय – 57 वर्षे

शिक्षणएम..पी.एचडी.

संपत्तीएकूण 3 कोटी 49 लाख

कुटुंबएक मुलगा, मुलगी

मागे

छगन भुजबळ यांचा परिचय
छगन भुजबळ यांचा परिचय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार य....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी

शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ....

Read more