ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल पण... ममता बॅनर्जी यांचं केंद्राला आव्हान

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल पण... ममता बॅनर्जी यांचं केंद्राला आव्हान

शहर : calcutta

         केंद्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू होऊ देणार नाही. यासाठी मला मरण पत्करावे लागले तरी याची मला पर्वा नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्वाच्या कायद्यावरून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.


       केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायदा व एनआरसीला देशभरातून विरोध होत आहे. देशातील नऊ राज्यांनी नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याची भूमिका या आधीच घेतली आहे. यात महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. आज पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे. 


          उत्तर २४ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पश्चिम बंगालमधील राज्यातील कोणाही व्यक्तीने अफवेला बळी पडू नका. ते (केंद्र सरकार) म्हणतात की, या ठिकाणी डिटेंशन सेंटर लावणार आहेत. परंतु, या ठिकाणी सत्तेत कोण आहे?, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतेय. पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर आजिबात लागू होणार नाही. यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी मी त्यासाठी तयार आहे, अशी ठाम भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.

 

        केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात याआधीच वक्तव्य केलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबाजावणी करणार नसल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौऱ्यावेळी दिली होती.
 

मागे

महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - माजी मुख्यमंत्री
महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - माजी मुख्यमंत्री

          महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत आज ....

अधिक वाचा

पुढे  

सोमवारी दुपारी १२ वाजता मंत्रीमंडळाचा शपथविधी 
सोमवारी दुपारी १२ वाजता मंत्रीमंडळाचा शपथविधी 

       मुंबई - येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी विधान ....

Read more