ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

शहर : jammu

श्रीनगर लोकसभा मतदार संघांत गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात नागरिकांचा प्रतिसाद नसल्यासारखाच होता. जवळपास ९० टक्के मतदान केंद्रांवर एकाही मतदात्यानं मतदान केलं नाही. यातील बहुतांश मतदान केंद्र श्रीनगरच्या मुख्य भागातील आहेत. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मतदान केंद्रांवर एकाही मतदारानं मतदान केलेलं नाही ते ईदगाह, खनयार, हब्बा कदल आणि बटमालू भागातील आहेत.

एकेरी आकड्यातील मतदान

ज्या सोनावर विधानसभा मतदार क्षेत्रात माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ली आणि उमर अब्दुल्ला यांनी मतदान केलं, ते क्षेत्र सोडलं तर इतर सातही विधानसभा क्षेत्रातील मतदानाची नोंद एकेरी आकड्यात झालीय. ईदगाह विधानसभा क्षेत्रात . टक्के मतदानाची नोंद झालीय. सोनावर विधानसभा क्षेत्रात १२ टक्के मतदान झालं.

या मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग असलेल्या गंदेरबल जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर एकाही मतदारानं मतदानासाठी हजेरी लावली नाही. बडगाम भागातील चडुरामध्ये पाच विधानसभा क्षेत्रांत सर्वात कमी . टक्के मतदान झालं. तर चरार--शरीफमध्ये सर्वाधिक ३१. टक्के मतदान झालं. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात १२,९५,३०४ नोंदणीकृत मतदार आणि १७१६ मतदान केंद्र आहेत.

निवडून येणाऱ्यांना खरंच 'लोकप्रतिनिधी' म्हणायचं का?

'नॅशनल कॉन्फरन्स'चे संरक्षक फारुक अब्दुल्ला श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. 'पीडीपी'कडून या मतदारसंघात आगा सय्यद मोहसिन, भाजपाकडून खालिद जहांगीर आणि 'पीपल्स कॉन्फरन्स'कडून इरफान अन्सारी यांना उमेदवारी देण्यात आलीय. 'नॅशनल कॉन्फरन्स'ला पाठिंबा देत काँग्रेसकडून श्रीनगर मतदारसंघातून आपला कोणताही उमेदवार दिला गेला नाही.

मागे

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

आपल्या देशात शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांचा....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण...
उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अखेर भाजपसोबत पुन्हा एकदा &....

Read more