ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 04:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते

शहर : मुंबई

यंदा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त या हेवीवेट लढतीमुळे येथील मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते खुले करत नसल्याने उत्तर मध्य मुंबईची लढत प्रत्येकवेळी रंगतदार अशीच होते. उत्तर मध्य मतदारसंघात बॉलिवूड कलाकारांची घरे, कुर्ला, कलीनामधल्या झोपडपट्ट्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात 5 लाख 73 हजार मराठी मतदार, साडे तीन लाख मुस्लिम, अडीच लाख उत्तर भारतीय, गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तर 73 हजार 387 ख्रिश्चन मतदार आहेत. 2014 मध्ये पूनम महाजन जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावर कुठल्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचा दबदबा नाही. त्यामुळे इथल्या मतदारांच्या मनात काय चाललंय, ते 23 मे रोजीच समजू शकेल.

मागे

बहूजन विकास आघाडीकडून  खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर
बहूजन विकास आघाडीकडून  खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर

पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आघाडीला सोडली ....

अधिक वाचा

पुढे  

उर्मिला मातोंडकर यांची संपत्ती कोटींच्या घरात 
उर्मिला मातोंडकर यांची संपत्ती कोटींच्या घरात 

उर्मिला मातोंडकर ही राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतल्यापासून बरीच चर्चेत आल....

Read more