By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार रविंद्र वायकर उपस्थित होते. गजानन कीर्तीकर आणि संजय निरुपम यांच्यात मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात दुहेरी लढत रंगणार आहे. गजानन कीर्तीकरांनी 2014 च्या निवडणूकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा 1 लाख 83 हजार 28 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2014 मध्ये मनसेकडून या मतदारसंघात अभिनेता महेश मांजरेकर रिंगणात होते. तर आम आदमी पक्षाकडून मयांक गांधी हे देखील निवडणूक लढवत होते. या निवडणूकीत मनसेला 66 हजार 88 मतदान झाले होते. तर आप पक्षाला 51 हजार 860 इतकी मतं मिळाली होती.
उत्तर मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या संपत्तीत ....
अधिक वाचा