ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपच्या अडचणी वाढणार असतील तर आम्हाला समजून घेता येणार नाहीत, आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच- उद्धव ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपच्या अडचणी वाढणार असतील तर आम्हाला  समजून घेता येणार नाहीत, आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच- उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

आतापर्यंत आपण भाजपच्या भरपूर अडचणी समजून घेतल्या. पण आता शिवसेनेला सत्तेत फिफ्टी-फिफ्टीचा वाटा हवाच, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते गुरुवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपची १२१ जागांवरून १०५ जागांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे ५८ च्या आसपास जागा जिंकण्याची शक्यता असणाऱ्या शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारपरिषेद उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीत आक्रमकता दिसून आली. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेला समसमान जागावाटप होणार हे ठरले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आमची अडचण समजून घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा आपण अडचण समजून घेत जागावाटपात कमीपणा घेतला. 

पण आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत. आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी संपूर्ण निकाल हातात आल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी एकत्र बसावे. गरज पडल्यास अमित शहा मुंबईत येतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सत्तास्थापन करण्याची शक्यताही फेटाळून लावली. मला कशाचीही घाई नाही. मी आरामात बसलोय. मात्र, सत्तेसाठी काहीही वेडेवाकडे करणार नाही, असे उद्धव यांनी सांगितले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत शिवसेना आणि भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास केला. अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल १५ जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मागे

शरद पवारांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं सोशल मीडियावर कौतुक
शरद पवारांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं सोशल मीडियावर कौतुक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आतापर्यंत स्पष्ट झाला आहे. 2014 पेक्षा 20....

अधिक वाचा

पुढे  

सातारा लोकसभा पोटनिवडणुक निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट
सातारा लोकसभा पोटनिवडणुक निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँ....

Read more