By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राजकारण कसे धक्के देते याचा अनुभव यावेळी तमाम महाराष्ट्राने गेला महिनाभर घेतला. या सत्ता संघर्षात कमालीचे रहस्यमय नाट्यही होतं, डावपेच होते, कलाटणी देणारे प्रसंग होते. नाटक आणि चित्रपटात दाखविण्यात येणार्या आश्चर्यकारक घटनाही वास्तवात पाहाला मिळालं. विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, अहंकार, अतिआत्मविश्वास हे सारे घडत असतानाच दुसरीकडे नात्यांमधील बंध हे किती नाजूक आणि अतूट असतात. तेही किती अतूट असतात हेही दिसून आले. सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी-कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस आघाडीने चालविलेले शर्तीचे प्रयत्न अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे, सर्वोच्च न्यायालयाने पारदर्शक पद्धतीने बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला आदेश अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास डगमगला आणि बहुमत सिद्ध करता येणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनीही राजीनामा दिला. भाजपचा अखेरचा डाव फासला. महाराष्ट्राच्या इतिहासात औट घटकेचे मुख्यमंत्री ठरल्याची नोंदही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची झाली.
या निमित्ताने महाराष्ट्रात खरे पहिलवान कोण आहेत, मुरब्बी चाणक्य कोण? चौफेर फटकेबाजी करणारे अष्टपैलू फलंदाज कोण? ठाकरे सरकार येण्यात महत्वाची भूमिका कोणी पार पडली? याची चर्चा होत राहील. मात्र नव्याने निवडून आलेल्या नवोदित आमदारांना या घडामोडीतून एक अनुभवी मिळाला असे मनाला हरकत नाही. या सर्व पाश्वभूमीवर आज आमदारांचा शपथविधीही झालाआ आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार, उद्या मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथही घेणार आहेत. एका अर्थाने महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार अशी चर्चाही रंगली आहे. आता सरकार सत्ता स्थापन होणार हेही निश्चित झालं आहे. या सरकारपुढे अनेक आव्हान आहेत. ती आव्हाने हे सरकार कशी पेलणार, यावर या सरकारचेच नव्हे तर आघाडीचा घटक पक्षांचेही भवितव्य अवलंबून आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे परस्पर विरोधी विचारधारा असणारे राजकीय पक्ष आघाडीत एकत्र आले आहेत. हे सरकार फार कल टिकणार नाही, असं भाजपसह अनेकांना वाटत आहे. त्यामुळे पाच वर्षे सत्ता टिकविण्याचे खरे आव्हान आहे. त्याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास मिळविणे हेही एक आव्हान आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या दिग्गज आणि मुरब्बी राजकीय नेत्याचे कसे सहकार्य लाभतं, यावरही बरचं काही अवलंबून आहे. शिवाय निवडणुकीत जनतेचा दिलेली आश्वासणे आघाडीतील पक्ष काशी पूर्णा करणार हेही पहावे लागेल.
महाराष्ट्रात गेले तीन ते साडेतीन महीने राज्यात सरकारच अस्तित्वात नव्हते अशी स्थिति आहे. निवडणूकींची आचारसंहिता लागू झाल्यापासून सत्ता स्थापन होईपर्यंत राज्यात गोंधळांची आणि संभ्रमाची स्थिति होती. सर्वसामान्य जनतेची, गरजू रुग्णांची कामे होत नव्हती. राज्यात ओल्या दुष्काळात शेतकरी हवालदिल झाले आहेत, बेरोजगारीची समस्या आहे. असे अनेक प्रश्न आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी प्रचारात १० रुपयात जेवण आणि शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन ते पूर्ण करणार का?
दुसरीकडे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यासह शिवसेनेला महाराष्ट्रात मजबूत करण्याची संधी आहे. पण त्याचबरोबर भाजपला महाराष्ट्रात शह देण्याचीही सर्वात मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. अर्थातही संधी साधण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांनी सत्ता स्थापनेसाठी जी एकजूट दाखविली ती एकजूट कायम राखली तरच महाराष्ट्रात भाजपला रोखणे त्याना शक्य होणार आहे. ही सर्व आव्हाने महाराष्ट्र विकास आघाडी काशी पेलणार यावर त्यांचंही भवितव्य अवलंबून राहणार आहे. आव्हाने, अपेक्षा या कसोटीवर हे सरकार टिकणार का, हे येणार्या काळात दिसेलच. त्यासाठी त्यांना अवधी हा द्यायलाच हवा. पाहूया पुढे काय होते ते!
विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभव....
अधिक वाचा