By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ उमेदवाराचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. गुरुवारपर्यंत रिंगणात ५५ उमेदवार होते. गुरुवारी सायंकाळी १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता केवळ १४ उमेदवार उभे आहेत. खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारे शेख यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि सपा-बसपा आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली असुन पा....
अधिक वाचा