By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2019 08:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्याचा विश्वासघात करु नका. जो शब्द शेतकऱ्यांना दिला तो पाळा असेही ते म्हणाले. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, हे त्यांच्या मनातील सरकार नाही नसल्याचा टोला त्यांनी लगावला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते.
स्थगिती सरकार अशी प्रतिमा या सरकारची होता कामा नये! #MaharashtraAssemblySession #WinterSession pic.twitter.com/g9SFymE39W
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2019
टेंडर झाले आहे, वर्क ऑर्डर द्यायचीय. राष्ट्रीय पेयजलच्या कामांना स्थगिती दिली आहे. नगरविकास, तीर्थस्थळांना स्थगिती दिली आहे. अशाने तुमच्या सरकारला लोकं स्थगिती सरकार म्हणतील असे फडणवीस म्हणाले.
त्रिशंकू म्हणजे 3 पक्ष एकमेकांवर शंका घेणारे असा खोचक टोला देखील फडणवीस यांनी लगावला. केंद्र सरकारच्या भरवशावर घोषणा का करता? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. संविधानिक तरतुदीनुसा १२ मंत्री असावेत, प्रत्यक्षात ६ मंत्रीच आहेत. आम्ही अपवाद मान्य केला पण शेतकऱ्यांना कुठलीही मदत होताना दिसून येत नसल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना कुठलीही मदत होताना दिसून येत नाही!#MaharashtraAssemblySession #WinterSession pic.twitter.com/URSlmuF999
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2019
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला कोंडीत धरू पाहणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सावरकर हा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, आधी आपल्यालाच सावरकर कळले आहेत का?, याचा विचार करायला हवा. सावरकरांचे समग्र हिंदुत्व, त्यांचे गायीबद्दलचे विचार भाजपला तरी मान्य आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आम्हालाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान हवा आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा. गोवंश हत्याबंदीचा कायदा देशातील सर्व राज्यांमध्ये का लागू करण्यात आला नाही? गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर आणि खासदार किरेन रिजीजू यांचे गोमांस खाण्याबाबतचे मत मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नागपुर - सकाळपासून माध्यमांवर एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या भे....
अधिक वाचा