ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

INX Media case : पी चिदंबरम जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

INX Media case : पी चिदंबरम जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार

शहर : delhi

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे सीबीआय कोर्टानं त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पी चिदंबरम यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे कळते.

आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी 305 कोटी रुपये लाच घेतल्याचा चिदंबरम यांच्‍यावर आरोप आहे. हे प्रकरण 2007 मधील असून तेव्हा ते केंद्रीय अर्थमंत्री होते. ईडीने गेल्या वर्षी पी चिदंबरम यांच्या विरोधात केस दाखल केली होती. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ति यांना यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.

मागे

कलम 370 : ट्रम्प यांची पाकिस्तानला तंबी
कलम 370 : ट्रम्प यांची पाकिस्तानला तंबी

­ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून संपर्क साधून अमेरि....

अधिक वाचा

पुढे  

ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या
ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर निराश झालेल्या ठाण्....

Read more