By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का देत आपला राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी पडळकर यांनी तयार केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी वंचितला रामराम करत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार सकारात्मक असून, पुढील दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करत वंचित ला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीने सोलापूरातील बार्शीजवळील शेलगाव ....
अधिक वाचा