By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जम्मू काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडलेल्या इमरान खान यांच्या सरकारला बडतर्फ करून पाकिस्तानी लष्कर देशाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात तेथील लष्कर प्रमूख जनरल बजावा यांनी केलेल्या हालचालीवरून आणि त्यांच्या आदेशाने 111 ब्रिगडच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पाकिस्तानात सत्ता बदलाचे संकेत मिळत आले आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार डबघाईस आली आहे. ही ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याठी जनरल बाजवा यांनी देशातील दिग्गज उद्द्योजक व्यापार्यांशी तीन वेळा गुप्त बैठका घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच देशातील 111 ब्रिगेडच्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा पाकिस्तानात गोंधळ झाला तेव्हा तेव्हा 111 ब्रिगेडचा वापर केला गेला आहे. त्यामुळे आताही याच ब्रिगेडला आदेश दिले गेल्याने पाक मध्ये ‘सत्ता बदलाचे संकेत’ मिळत आहे. पाकिस्तान सेनेची 111 ब्रिगेड रावळ पिंडी मध्ये तैनात असते ती पाकिस्तान सेनेच्या हेड क्वार्टर ची गरिसन ब्रिगेड आहे.
काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात मात्र निवडणुका, प्रचार ह्या सग....
अधिक वाचा