By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबधावर घाव घालीत भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार रोखला आहे. शिवाय भारतीय विमानांना आपली हवाई हद्द बंद केली आहे.
पाकिस्तान भारतातून मोठ्या प्रमाणात कांदे, टोमॅटो आणि रसायनांची आयात करतो. व्यापारबंदीमुळे भारतातून या वस्तूंचा पुरवठा बंद होणार आहे. म्हणजेच व्यापार बंदीचा निर्णय घेऊन पाकने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानी अतिरेक्यांनी जानेवारी 2016 मध्ये पठांनकोटयेथील तळावर केलेल्या हल्यानंतर भारताने आधीच राजनैतिक पातळीवरील संवाद थांबविला आहे. तर पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी व्यापारी संबंध रोखले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या 'आक्रमक' पावित्र्यातील हवा आधीच गेली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
भारत आणि पाकिस्तानला जोडणार्या समझौता एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाला पाक....
अधिक वाचा