ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कुलभूषण जाधव केस : पाकिस्तान नरमला, भेटीला परवानगी

शहर : विदेश

कुलभूषण जाधव केसच्या बाबाबतीत आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याच्या निर्णायानंतरही तयार न होणार्‍या पाकिस्तानने अखेर माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देणार असल्याचे पाकिस्ताने संगितले आहे. सोमवारी भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना जाधव यांना भेटू दिले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देणार असल्याची माहिती ट्वीटर वरून दिली. व्हीएन्ना करार , आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि पाकिस्तानच्या कायद्याच्याअधीन राहून ही मदत देत असल्याचे त्यांनी यात सांगितले आहे.

यापूर्वीही पाकिस्तानने अनेक अटी लागू करून कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कोणत्याही अटी न ठेवता खुलेपणाने  दूतावासाच्या अधिकार्‍याना भेटू द्यावे, असे सांगत भारताने त्या वेळेस तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. आता नव्याने प्रस्ताव आल्याने ह्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध भारताने आयसीजेकडे दाद मागितली होती. त्यावेळेस न्यायालयाने दुतावासाला भेटायला द्यावे, असे सांगितले होते.

मागे

पत्रकारावर शरद पवार संतप्त ,काय होता तो प्रश्न ?
पत्रकारावर शरद पवार संतप्त ,काय होता तो प्रश्न ?

शुक्रवारी श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

लालू प्रसाद यादव यांची तब्बेत बिघडली
लालू प्रसाद यादव यांची तब्बेत बिघडली

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद याद....

Read more