ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकची पुन्हा अण्वस्त्राची धमकी

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकची पुन्हा अण्वस्त्राची धमकी

शहर : देश

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून अस्वस्थ झालेला पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलीय. रविवारी पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरच्या घाटी परिसरात हल्ला करून 4 दहशतवादी टीएल उध्वस्त केले. यात 22 दहशतवाड्यांसह पाकचे 11 सैनिक ठार झाले. या कारवाईने अधिकच बिथडलेला पाकिस्तानने अण्वस्त्राची धमकी दिली.

पाकची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे. पाक लष्कराने त्यासाठीच आता तेथील सूत्रे हाती घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. दुसरीकडे जम्मू कश्मीर मुद्यावरून पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाठिंबा मिळालेला नाही. त्यातच अडचणीत असलेल्या पाकला अमेरिकेसह यूरोपियन देश आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधिकडून अर्थ साहाय्य मिळण्याची आशा मावळतेय. कारण पाकने अर्थ साहाय्य घेताना ज्या अटींची पूर्तता करणे अपेक्षित होते ते केलेले नाही. मिळालेले अर्थ साहाय्य भारताविरुद्ध कारस्थाने करण्यात आणि दहशतवाद्यांना बळ देण्यात खर्च केल्याने पाक कंगाल झालेला दिसत आहे. त्यातच भारताविरुद्ध केलेल्या छुप्या कारवायाही फोल ठरत आहेत. भारताने पुरती नाकेबंदी केल्याने पाक असा अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या देत जगावर दबाव आणण्याचा डाव खेळत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

ज्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध होईल ज्या प्रकारची आवश्यकता असेल त्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर आम्ही करू युद्ध झाल्यास, पारंपरिक युद्ध होणार नाही. झालेच तर अण्वस्त्र होईल असा इशारा पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिला आहे.

 

मागे

मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ
मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला निवडण....

अधिक वाचा

पुढे  

गोदाकाठच्या लोकांची रस्त्यासाठी अभूतपूर्व ऐकी
गोदाकाठच्या लोकांची रस्त्यासाठी अभूतपूर्व ऐकी

सोनपेठ:-तालुक्यातील गोदाकाठच्या गावांनी रस्त्यासाठी मतदान न करण्याचा निर....

Read more