ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं उत्तर; म्हणाले, राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड, विसरलात काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 11, 2024 02:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं उत्तर; म्हणाले, राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड, विसरलात काय?

शहर : मुंबई

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, नारायण राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड. तुम्ही 'त्या' घटना जरा आठवा... ठाकरेंच्या टीकेला शिंदेंनी काय उत्तर दिलं? पालघरमध्ये बोलताना शिंदे नेमकं काय म्हणाले?

राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटनांवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घटनांवर शिंदेंनी बोट ठेवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पालघरमध्ये झालेले साधू हत्याकांड झालं. हनुमान चालीसा पठण करणाऱ्या राणादांपत्यावर जेलमध्ये टाकून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला. ते तुम्ही विसरलात का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिंदेंचा ठाकरेंना सवाल

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंनी केलेल्या भाषणाविरोधात एका केंद्रीय मंत्राला जेवणावरून उठवून जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. अभिनेत्री कंगना राणावतचं घर तोडायला एक कोटी रुपये महापालिकेच्या खर्च केले. त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान यांची देखील पुरावे मिटवण्याचं काम त्या सरकारने केल्याची चर्चा आहे. हे तुम्ही विसरलात का?, असंही शिंदे म्हणालेत.

शिंदेंचं ठाकरेंना उत्तर

अर्णव गोस्वामी यांना ही जेलमध्ये टाकलं तेव्हा गोंधळ चालू होता. त्यावेळेस गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. महाराष्ट्राला बिहार म्हणणाऱ्यांना चंबल ही कमी पडेल? अशी त्यावेळेची गुंडाराज सुरू होते. दरोडेखोरी सुरू होती त्यांना विहार म्हणण्याचा अधिकार नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

यांची भूमिका दुटप्पी

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अंबानीच्या घराखाली बॉम्ब लावण्याचे काम त्यांच्या सरकारमधील एका पोलीस अधिकाऱ्याने लावलं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा परिस्थितीमध्ये आरोप करणं सोपं आहे. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. अडीच वर्षाच्या काळात जी दरोडेखोरी गुंडागिरी सुरू होती ती शोभणारी नव्हती. त्याचा त्यांनी हिशोब दिला पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

त्या दरोडेखरांनी मुंबई महापालिका लुटली खिचडी घोटाळा,कोविड बॉडी बॅग घोटाळा,कोविड सेंटर घोटाळा ऑक्सिजन प्लांट त्यावेळी एकीकडे लोक मरत होते. दुसरीकडे पैसे मिळवणारी टोळी सक्रिय होते. आता ते जेलमध्ये जात आहेत. हे अर्बन थीफ असून ते परवडणारे नाही त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा घणाघात शिंदेंनी केला आहे.

मागे

करमचंद जासूस…गुंडांचे सरदार…फेकूचंद…संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
करमचंद जासूस…गुंडांचे सरदार…फेकूचंद…संजय राऊत यांचा जोरदार हल्ला

एकनाथ शिंदे हे गुंडांचे सरदार आहे. ते चोरांची टोळी चालवत आहे. मुख्यमंत्र्या....

अधिक वाचा

पुढे  

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेस आमदारांचा गट घेऊन भाजपात जाणार?
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेस आमदारांचा गट घेऊन भाजपात जाणार?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आम....

Read more