By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 07:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शहापूरचे राष्ट्र वादी कॉंग्रेसचे राजीनामा दिलेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांना शिवबंधन बांधलं . यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे , आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना चे दिग्गज नेते उपस्थित होते.
आमदार पांडुरंग बरोरा यांनी काल आपला राजीनामा हरिभौ बागडे यांच्याप्रमाणे सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शहापूर येथून 100 गाड्यांचा ताफा निघाला. त्यांच्यासोबत रास्त्र्वडीचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा बरोरा यांनी केला होता त्यामुळे शहापूर मध्ये राष्ट्रवादीला हा खूप मोठा झटका असल्याचे मानले जाते.
राज्यातील नद्यांनी प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेश....
अधिक वाचा