ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

शहर : मुंबई

भारतीय जनता पार्टी नेत्या पंकजा मुंडे भाजपला सोड चिट्टी देऊन शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण पंकजा मुंडे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, पुढील राजकीय वाटचाल काय असेल? कोणत्या मार्गाने जायचे हे १२ डिसेंबरला सांगणार आहे. या पोस्टनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपचं नामेनिशाण हटवलं आहे. यावरून पंकजा मुंडे नाराज असून त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या पत्रकार परिषदेत अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबूक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. १२ डिसेंबरला भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिनी पंकजा मुंडे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी त्या आपली भूमिका स्पष्ट करतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा त्यांचे बंधू, राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याने त्या नाराज असल्याचे म्हंटले जात आहे. त्याच बरोबर शिवसेनेशी त्यांची शिवसेनेशी असलेली जवळीक सर्वक्षुत आहे. इतकेच काय पण सध्या पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात सूत्रांकडून मिळत आहे.      

मागे

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट,फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत
भाजप नेत्याचा गौप्यस्फोट,फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईचा डबेवाला देणार १० रुपयात पोटभर जेवण!
मुंबईचा डबेवाला देणार १० रुपयात पोटभर जेवण!

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरिबांना फक्त १० रुप....

Read more