By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 03:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
परळी - भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यवेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी २६ डिसेंबरपासून राज्यभर दौरा करणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार, मी आज जाहिर करते की, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीतून मुक्त होत आहे. पुढील काही दिवसात मी गोपीनाथ मुंडेंचे औरंगाबादमधील कार्यालय पुन्हा सुरु करणार आहे.
महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या खास कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंकजा मुंडे यांनी भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे सांगत बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली? माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाची पुन्हा एकदा खोड काढली. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही घडवला, पंकजाला बोलता येत नाही ती वेदना सहन करतेय असा घणाघाती प्रहार स्वपक्षावर केला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श....
अधिक वाचा