By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रकाश मेहता यांना भाजपा कडून मिळण्याची अपेक्षा होती मात्र त्यांना उमेदवारी घोषित झाली नाही त्यामुळे प्रकाश मेहता यांच्या जागी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला.
गाडी हल्ला केला यावेळी पराग शाह गाडीतच बसलेले होते. आपण सुरक्षित असल्याची माहिती पराग शाह यांनी दिली. दरम्यान कार्यकर्त्यांची समजूत घालणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली.
आपण पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करणार नसल्याचं पराग शाह यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांचा राग समजू शकतो, मात्र प्रकाश मेहता आपल्या पाठीशी आहेत. त्यांची नाराजी नाही. ते आपल्याला पाठिंबा देणार आहेत. मेहता कार्यकर्त्यांचं मन वळवतील, असाही विश्वास शाहांनी बोलताना व्यक्त केला.
विधानसभेसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. २०....
अधिक वाचा