ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाचं वृत्त पवारांनी फेटाळलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 07:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाचं वृत्त पवारांनी फेटाळलं

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पण यादरम्यान दिल्लीत आणखी काही घडामोडी पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलr होती. पण शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. अशी कोणतीही चर्चा नाही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याआधी विरोधी पक्षनेतेपदासाठी हे विलिनीकरण केलं जावू शकतं अशी बातमी येत होती. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण संख्येंच्या १० टक्के जागा जिंकण आवश्यक असतं. काँग्रेसला जर विरोधी पक्षनेतेपद हवं असेल तर त्यांना एकूण ५४ जागा हव्या आहेत. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या आहेत. पण शरद पवार यांनी आता हे वृत्त फेटाळल्याने विरोधीपक्ष नेतेपदाचं काय होणार हे येणारी वेळच सांगेल.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलिनीकरण झालं तर काँग्रेसच्या खासदारांचं संख्याबळ हे ५७ वर पोहोचेल. विलिनीकरण झालं तर राहुल गांधी हे विरोधीपक्ष नेते होऊ शकतात. अशी देखील चर्चा आहे.शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

पुढे  

जुलैच्या पहिल्याच आठवड्यातच मोदी सरकारचा अर्थसंकल्प
जुलैच्या पहिल्याच आठवड्यातच मोदी सरकारचा अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. मोदी सरक....

Read more