ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पायल रोहतगीचा जामीन मंजूर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पायल रोहतगीचा जामीन मंजूर

शहर : delhi

            नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी न्यायालयाने २४ डिसेंबर अभिनेत्री पायल रोहतगीला पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतु आज न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे. पायल रोहतगीला २५ हजारांच्या दोन साक्षीदारांच्या बाँडवर जामीन मिळाला. टेलिव्हिजनवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धी झोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अनेकदा तिच्या काही ना काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

 


             पायलला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री कोयना मित्रा आणि दिग्दर्शिका रीमा कागती तिच्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. आपल्याला अटक झाल्याची माहिती स्वत: पायलने ट्विटच्या माध्यमातून दिली होती. 


             १० ऑक्टोबर रोजी पोलिसांना पायल विरोधात तक्रार मिळाली होती. ही तक्रार काँग्रेस कार्यकर्ता चर्मेश शर्माने पायल विरूद्ध दाखल केली होती. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून टिपणी केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.


              दरम्यान, 'मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. हा व्हिडिओ मी गुगलवरुन माहिती मिळवून तयार केला होता. बोलण्याचं स्वातंत्र्य हा विनोद झाला आहे' असं ट्विट केलं होतं, पायलने ट्विटरवर राजस्थान पोलीस, पीएमओ आणि गृहमंत्री कार्यालयाला देखील टॅग केलं होतं. परंतु आता न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे.  

मागे

आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह
आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह

           नवी दिल्ली -  सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आं....

अधिक वाचा

पुढे  

महापौरांच्या गाडीवर गोळीबार
महापौरांच्या गाडीवर गोळीबार

                   नागपूर- नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्....

Read more