By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - काँग्रेसच्या 135 व्या वर्धापनदिनी प्रियांका गांधी लखनऊ दौऱयावर असून प्रियांका गांधी यांनी संविधान वाचत कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे.
त्या म्हणाल्या, आज देशभक्तीच्या नावाखाली लोकांना त्रास दिला जात आहे. सीएए आणि एनआरसीकडून भीती दर्शविली जात आहे. आज मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपला देश आज संकटात आहे. सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबत असून त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढे त्यांनी सपा आणि बसपावर टीका करताना म्हटले की, इतर पक्ष सरकारला घाबरत आहेत, ते काही बोलत नाहीत. मात्र, कॉग्रेसने संघर्षाचे आव्हान स्वीकारले असून काँग्रेस कायमच जाचक विचारसरणीला विरोध करेल.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या 135 व्या वर्धापनदिनी राहुल गांधी यांनी पु....
अधिक वाचा