ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल- पवार

शहर : baramati

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपानं विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपानंबारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपानं यंदा कंबर कसली. बारामती पाडली, तर त्यावर पुस्तक लिहावं लागेल असं विधान काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याशिवाय यंदा बारामती सुप्रिया सुळेंना जड जाईल, अशी विधानं भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला. 'ईव्हीएम हॅक करता येतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मात्र कोणतंही बटण दाबल्यास मत भाजपालाच जातं, अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. भाजपा नेत्यांचे बारामतीबद्दलचे दावे पाहता, त्यांनी काही नियोजन केलंय की काय, अशी शंका येते,' असं पवार म्हणाले.बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकांचा निवडणुकांवरील विश्वास जपायला हवा. त्यासाठी निवडणूक आयोगानं आवश्यक सुधारणा घडवायल्या हव्यात. लोकांचा विश्वास उडाल्यावर मग ती कोणत्याही टोकाला जातात. त्यामुळे त्यांचा विश्वास जपणं गरजेचं आहे, असंदेखील पवार म्हणाले. बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांचं आव्हान आहे.

मागे

निवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी,राहुल शेवाळे यांच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा
निवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी,राहुल शेवाळे यांच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा

शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आताचे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार ....

अधिक वाचा

पुढे  

“घरात घुसून मारणार, गोळीला प्रत्यूत्तर गोळीनंच” - नरेंद्र मोदी
“घरात घुसून मारणार, गोळीला प्रत्यूत्तर गोळीनंच” - नरेंद्र मोदी

पंतप्रधान झाल्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदी पहिल्यादांच अयोध्येत दाखल झाले....

Read more