By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना ‘महासेनाआघाडी’ सरकार स्थापन करु देण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेची गुंतागुंत अधिक वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकत्र येऊन आघाडी करण्याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकार लवकर सत्तास्थापन करुन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मतदार धावा करत आहेत. मात्र त्याआधीच या संभाव्य आघाडीला चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आघाडी असंविधानिक आहे. निवडणूक प्रक्रिया आणि भारतीय संविधानासोबत ही गद्दारी आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लक्ष घालून सरकार बनण्यापासून थांबवावं’ असं याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत जोशींनी तिन्ही पक्षांना पक्षकार केलं आहे.या प्रकरणावर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी जस्टिस एन वी रमना यांच्याकडे करण्यात आली होती, परंतु त्यास नकार देण्यात आला आहे. या केसवर ठरल्याप्रमाणे सुनावणी होईल, असं जस्टिस एन वी रमना यांनी स्पष्ट केलं.
मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने खेळवतो, मी खेळाडू नाही, क्रिकेट खे....
अधिक वाचा