By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - ट्विटरवर युजर्सच्या हजरजवाबीपणाचेही कौतुक होते. अनेक दिग्गज मंडळी सोशल मीडियावर आपल्या हजरजवाबीपणामुळे चांगलेच चर्चेत असतात. पंतप्रधान मोदींच्या हजरजवाबीपणाचे सध्या नेटिझन्सकडून कौतुक सुरू आहे.
देशभरात आज सूर्यग्रहण पाहण्यासाठी आबालवृद्धांमध्ये उत्साह दिसत होता. दशकातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदींनीदेखील तयारी केली होती. सूर्यग्रहण पाहण्यासाठी केलेली तयारी आणि त्याबाबतची माहिती पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटद्वारे दिली. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींचे काही खास कँडिड फोटोदेखील होते.
त्यामुळे या फोटोतून पंतप्रधान मोदींवर मीम्स बनतील असा नेटिझन्सचा होरा होता. पंतप्रधान मोदींनी ट्विट केल्यानंतर काही वेळेतच एका युजरने हा फोटो मीम् बनणार असल्याचे ट्विट केले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी हजरजवाबीपणा दाखवत तुमचं स्वागत आहे...एन्जॉय करा! असे ट्विट केले.
चेन्नई - त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी....
अधिक वाचा