By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले, मी मध्य प्रदेशात होतो, तिथूनच इकडे पोहोचलो. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आपली लोकशाही विविधतेनं भरलेली आहे. . जगाला प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आहेत. सरकार सक्षम असल्यानंच आयपीएल, रमझान आणि नवरात्रीसारख्या गोष्टी शांततापूर्ण वातावरणात झाल्या. ही आपल्या देशाची ताकद आहे. पूर्ण बहुमताचं सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुन्हा निवडून येईल, असं फार वर्षांनंतर होणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.
2014मध्ये एकदा संधी मिळाली, आता 2019मध्ये पुन्हा एकदा संधी मिळत आहे. पाच वर्षांत मी भरीव काम केलं. अनेक चढ-उतार आले, पण प्रत्येकवेळी देशानं साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीतल्या प्रचारात मी पाच वर्षांच्या जनता जनार्दनानं दिलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहेत. जनता पहिल्यांहून अधिक आशीर्वाद आम्हाला देत आहे. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल आला होता. 17 मे रोजी मोठी घटना घडली.
आज 17 मे आहे. गेल्या निवडणुकीत याच दिवशी मोदींच्या उपस्थितीनं सट्टाबाजाराला मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सट्टाबाजार बुडाला होता. त्यामुळे 17 मेपासूनही प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होती. मला आतापर्यंत एकही कार्यक्रम रद्द करावा लागलेला नाही, असंही मोदी म्हणाले आहेत.
नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या वक्तव्यासाठी मी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांन....
अधिक वाचा