By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 27, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळेतच देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, त्यांना तुम्ही टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावर ऐकू शकता. पंतप्रधान मोदी काही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. मोदी काय बोलतील याबाबत संपूर्ण देशाला उत्सूकता लागली आहे.
पंतप्रधान मोदींनी सकाळी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या मंत्र्यांना बोलवण्यात आलं होतं. सुरक्षा समितीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.
याआधी ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे देशाला संबोधित करत असताना नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याची मोठी घोषणा केली होती.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणाताही राजकीय किंवा धोरणात्मक निर्णय नाही घेऊ शकत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून आहे.
अभिनेत्री जया प्रदा यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्या रा....
अधिक वाचा