ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राच्या निकालावर मोदी आणि शाहंची प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राच्या निकालावर मोदी आणि शाहंची प्रतिक्रिया

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी झाला. निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही पण महायुतीची आकडेवारी बहुमताची आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील शंभरचा आकडा पार केला आहे. 110 जागांपैकी फक्त एकाच जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 2014 पेक्षा 2019 चा निवडणुक निकाल हा धक्कादायक होता.

भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रात दाखल झाले होते. भाजपच्या बड्या उमेदवारांकरता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा देखील घेतल्या. पण त्या सभांची फार मदत झाली असं म्हणता येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र आणि हरयाणातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा जनतेचा आशीर्वाद प्राप्त केला आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये चांगली कामे केला आणि त्या चोरावर आज पुन्हा सत्तेत येण्याची किमया साधली.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. जनतेची सेवा आम्ही केली तशीच यापुढे देखील आम्ही करणार आहोत. भाजप- शिवसेना युतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेचे आभार !अमित शाह यांच्यावर दोन्ही राज्यांतील सरकार स्थापनेची जबाबदारी आहेदिल्लीत भाजपाच्या संसदीय समितीच्या  बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत दोन्ही राज्यांतील निवडणुकीच्या निकालांवरही चर्चा होणार आहे.

मागे

सातारा लोकसभा पोटनिवडणुक निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट
सातारा लोकसभा पोटनिवडणुक निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँ....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग
निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग

निवडणूक निकालानं भाजपा आणि शिवसेना दोघांचाही अपेक्षाभंग केला आहे. युतीनं स....

Read more