By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी 'पारदर्शक कर - सन्माननीय' करप्रणाली सुरु केली आहे. या नव्या प्रणालीमुळे देशातील करदात्यांना अनेक सुविधा पुरविल्या जातील. त्यांना प्राप्तीकरापासून मुक्तता मिळेल आणि अनावश्यक कटकटीपासून मुक्तता होईल. ही करप्रणाली लॉन्च करताना पंतप्रधान मोदी यांनी एकीकडे प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे कर न भरणाऱ्यांना सल्ला दिला. ही नवी करप्रणाली आजपासून लागू होणार असल्याचे मोदींनी सांगितलं आहे.वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. करभरणाऱ्यांमुळे देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणे योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणालेत, आम्ही धोरणात्मक बदलाला महत्त्व दिले आहे. प्रत्येकाचा दुसऱ्याशी संबंधही असला पाहिजे याकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे याचा चांगला परिणाम दिसून येईल. एक काळ असा होता की बदल करण्यासंबंधी खूप चर्चा व्हायची. काही वेळा दबावात किंवा इच्छा नसतानाही निर्णय घेत बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात यायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
आजोबा आणि नातवामधील वाद आहे. यामध्ये आजोबांनी नातवाला किंवा नातवाने आजोबां....
अधिक वाचा